पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत मोहम्मद हुस्सेन खान, सिद्धार्थ पारीख आणि कमल चावला यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पंडित जावडेकर असोसिएट्स संघाने वायएमएसए यंगस्टर्सचा 3-0 असा सहज पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ड गटात पंडित जावडेकर असोसिएट्स संघाने वायएमएसए यंगस्टर्सचा 3-0 असा पराभव केला. सामन्यात पंडित जावडेकर असोसिएट्सच्या मोहम्मद हुस्सेन खान याने अनमोल पंडिताचा 40-00, 95-06, 48-27 असा, तर पंडित जावडेकर असोसिएट्सच्या सिद्धार्थ पारीख याने क्रिश गुरबयानीचा 31-36, 65-66, 40-14,103(47,36)-00 असा पराभव केला. सिद्धार्थ पारीखने आपल्या खेळीत चौथ्या फ्रेममध्ये 47 व 36 गुणांचा ब्रेक नोंदविला. तिसऱ्या लढतीत कमल चावला याने जीत भोजनीचा 44-00, 35-61, 38-22, 74-08 असा पराभव केला.
ब गटात लक्ष्मण रावत, लकी वटनानी व फैजल खान यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाने पीवायसी जायंट्सचा 3-0 असा पराभव करून आगेकूच केली. सामन्यात फैजल खान याने आपल्या खेळीत दुसऱ्या व चौथ्या फ्रेममध्ये अनुक्रमे 61 व 50 गुणांचा ब्रेक नोंदविला. क गटात कॉर्नर पॉकेट क्युईस्ट संघाने पॉट ब्लॅक संघावर 3-0 असा सनसनाटी विजय मिळवला.
अन्य लढतीत क गटात एलसीएसए संघाने क्यू क्लब एसेस संघाला 3-0 असे नमविले. विजयी संघाकडून शोएब चंद्रा, आयुश मित्तल, अक्षय कुमार यांनी अफलातून कामगिरी बजावली. ग गटात बीएसएए मास्टर्स संघाने 147 पूल अँड स्नूकर संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
गट ब: कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स वि.वि.पीवायसी जायंट्स 3-0(लक्ष्मण रावत वि.वि.रोहित नारगोलकर 50-00, 73(60)-09, 36-09; लकी वटनानी वि.वि.सलील देशपांडे 42-18, 78-18, 11-34, 56-43; फैजल खान वि.वि.अरुण बर्वे 49-05, 93(61)-15, 18-38, 69(50)-16);
गट क: केव्हीडी स्क्वाड वि.वि.क्यू क्लब एसेस 2-1(गौरव जयसिंघानी वि.वि.अभिषेक बोरा 26-32, 73-24, 47-13, 64-24; जयेश साळवी वि.वि.निलेश पाटणकर 57-19, 49-28, 42-22; अभिनय एढे चाल पुढे चाल वि.सचित जामगावकर);
गट क: कॉर्नर पॉकेट क्युईस्ट वि.वि.पॉट ब्लॅक 3-0(हसन बदामी वि.वि.कैवल्य जाधव 12-38, 60-01, 36-24, 59-09; मुकुंद भराडिया वि.वि.विपुल सोनटके 58-20, 73-08, 39-07; राहुल सचदेव वि.वि.हरीश गायकवाड 33-18, 69-54, 18-14);
गट क: एलसीएसए वि.वि.क्यू क्लब एसेस 3-0(शोएब चंद्रा वि.वि.अभिषेक बोरा 01-65(54), 57-41, 46-09, 66-46; आयुश मित्तल वि.वि.निलेश पाटणकर 41(41)-01, 73(52)-42, 34-14; अक्षय कुमार वि.वि.सचित जामगावकर 27-28, 53-06, 28-15, 59-45);
गट ड: पंडित जावडेकर असोसिएट्स वि.वि.वायएमएसए यंगस्टर्स 3-0(मोहम्मद हुस्सेन खान वि.वि.अनमोल पंडिता 40-00, 95-06, 48-27; सिद्धार्थ पारीख वि.वि.क्रिश गुरबयानी 31-36, 65-66, 40-14,103(47,36)-00; कमल चावला वि.वि.जीत भोजनी 44-00, 35-61, 38-22, 74-08;
गट ग: बीएसएए मास्टर्स वि.वि.147 पूल अँड स्नूकर 2-1(आनंद रघुवंशी पराभूत वि.चैतन्य हळबे 30-27, 54-59, 23-35, 79-42, 05-31; रोविन डिसुझा वि.वि.जवाहर मानकर 44-16, 91-21, 68-14; अभिमन्यू गांधी वि.वि.मनोज गाडगीळ 54-00, 37-62, 22-36, 64-24, 72(72)-00);