मुळशी क्रिकेट मैदान व डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत महेश घोरपडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुणे विनर्स संघाने इस्टर्न नाईटस् संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सुधीर के व महेश घोरपडे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे इस्टर्न नाईटस् संघ 15 षटकात 7 बाद 88 धावांत गारद झाला. 88 धावांचे लक्ष महोश घोरपडेच्या 32 व ज्ञानेश्वर झेंडेच्या 30 धावांसह पुणे विनर्स संघाने 3 षटक बाकी राखत 5 बाद 91 धावा करून पुर्ण करत विजय मिळवला. 32 धावा व 2 गडी बाद करणारा महेश घोरपडे सामनावीर ठरला.
आयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पुणे विनर्स, रायझींग स्टार कोल्हापुर संघांची आगेकुच
पुणे: आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 तर्फे आयोजित आयएफसीआर आरपीएल अरबन बॅटल टी 15 स्पर्धेत रायझींग स्टार कोल्हापुर संघाने नाशिक एव्हरशाइन संघाचा तर पुणे विनर्स संघाने इस्टर्न नाईटस् पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
मुळशी क्रिकेट मैदान व डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत महेश घोरपडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुणे विनर्स संघाने इस्टर्न नाईटस् संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सुधीर के व महेश घोरपडे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे इस्टर्न नाईटस् संघ 15 षटकात 7 बाद 88 धावांत गारद झाला. 88 धावांचे लक्ष महोश घोरपडेच्या 32 व ज्ञानेश्वर झेंडेच्या 30 धावांसह पुणे विनर्स संघाने 3 षटक बाकी राखत 5 बाद 91 धावा करून पुर्ण करत विजय मिळवला. 32 धावा व 2 गडी बाद करणारा महेश घोरपडे सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत शैलेश भोसलेच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रायझींग स्टार कोल्हापुर संघाने नाशिक एव्हरशाइन संघाचा 7 गडी राखून मोठा पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सचिन गाडगीळच्या आक्रमक गोलंदाजीने नाशिक एव्हरशाइन संघाचा डाव 15 षटकात 6 बाद 135 धावांत रोखला. 135 धावांचे लक्ष प्रितेश करणावतच्या 32, शैलेश भोसलेच्या 30 तर सत्यजीत पाटीलच्या 31 धावांसह रायझींग स्टार कोल्हापुर संघाने 14 षटकात 3 बाद 136 धावांसह पुर्ण केले. शैलेश भोसले सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
इस्टर्न नाईटस्- 15 षटकात 7 बाद 88 धावा(अनिरूध्द बार्गी 30, रिषी अगरवाल 22, सुधीर के 3-8, महेश घोरपडे 2-10) पराभूत वि पुणे विनर्स- 12 षटकात 5 बाद 91 धावा(महोश घोरपडे 32, ज्ञानेश्वर झेंडे 30, देवदत्त देशपांडे 12, अंशुमन अग्रीनल्ला 1-4, अभिषेक अगरवाल 1-28, अनिरुध्द बार्गी 1-20) सामनावीर- महेश घोरपडे
पुणे विनर्स संघाने 5 गडी राखून सामना जिंकला
नाशिक एव्हरशाइन- 15 षटकात 6 बाद 135 धावा(संतोष दिंडे 33, तुषार चव्हाण 30, निलेश ठाकुर 25, ब्रिजमोहन लोंगानी 28, सचिन गाडगीळ 3-25, संजय सालोखे 1-35, रवीराज सायदेव 1-26) पराभूत वि रायझींग स्टार कोल्हापुर- 14 षटकात 3 बाद 136 धावा(प्रितेश करणावत 32, शैलेश भोसले 30, सत्यजीत पाटील 31, संजय सालोखे 18, दिनेश ठाकुर 1-24, संतोष दिंडे 1-25) सामनावीर- शैलेश भोसले
रायझींग स्टार कोल्हापुर संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.