पुणे: राजेश वाधवान समूह यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीगमधील टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने डिएगो कार्लोस याला करारबद्ध करण्यात आले असून त्याच्या समावेशमुळे संघाची ताकद आणखी वाढली आहे. 29वर्षीय डिएगो एफसी पुणे सिटीकडून इंडियन सुपर लीग स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत आहे.
एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, डिएगोकडे आक्रमकतेने ताबा मिळविण्याचा हातखंडा आहे. एक आक्रमक मध्यरक्षकशिवाय चेंडूवर उत्तम ताबा मिळविण्याचे कौशल्य त्याच्याकडे असल्यामुळे त्याचा समावेश आमच्या संघासाठी जमेची बाजू ठरणार आहे. मार्सिलीन्हो, जोनातन लुक्का यांच्यासह आणखी एका ब्राझिलीयनचा समावेश संघात झाला आहे.
डिएगो याने आपल्या युवा कारकिर्दीची सुरुवात फ्लामिंगो संघाकडून केली. त्यानंतर तो ब्राझिलियाच्या डुक्यू डी कॅक्सिस व कोरींथियंस अलागोनो या क्लबमध्ये सहभागी झाला. 2011 मध्ये रशिया येथील रशियन राष्ट्रीय लीग स्पर्धेमध्ये निझनी नोवगोरोड संघाकडून खेळताना त्याने 31 सामन्यांमध्ये 10गोल केले. त्यानंतर 2012मध्ये एफसी उफाच्या एफसी लुच एनर्जीया वाल्दीवोस्टोककडून खेळतानाया त्याने 8गोल करून संघाला रशियन प्रिमियर लीगच्या अव्वल श्रेणी विभागात प्रवेश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली.
यावेळी डिएगो कार्लोस म्हणाला कि, माझ्या फुटबॉल कारकिर्दीतील हे एक नवीन सुरुवात आहे. या लीग स्पर्धेबरोबरच एफसी पुणे सिटी संघाविषयी चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. माझ्या देशातील सहकारी मार्सिलीन्हो, जोनातन लुक्का यांच्यासह संघाकडून खेळण्यास मी उत्सुक आहे आणि चाहत्यांना विजय साजरे करण्यासाठी मी क्लबकडून खेळताना 100 टक्के योगदान देईन, अशी खात्री देतो