न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव
पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेत वार्षिक क‘ीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, डॉजबॉल, लंगडी या सांघिक खेळांच्य स्पर्धा घेण्यात आल्या. बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मु‘याध्यापक नागेश मोने यांच्या मार्गदर्शनाखाली उपमु‘याध्यापिका मनिषा मिनोचा, पर्यवेक्षिकाअनिता भोसले, शिक्षक प्रतिनिधी आनंदा पाटील, रोहिणी पंचवाडकर, पालक प्रतिनिधी मंगेश कुडले, विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत बुरटे, शनिविजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.