पुणे-घरोघरी दिवा लागावा ,प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या घरावर आकाश कंदील दिसावा अशा भावनेने शाळकरी मुलांनी उभारी घेतली आणि प्रत्येक श्रमिकाच्या घरावर आकाश कंदील उभारण्याची घाई केली. त्यांची ती नवलाई, तो उत्साह ;त्यांच्या मना मनात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचा आनंद कसा ओसंडून वाहतो आहे तेच दाखवीत होता .
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेतील विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या तासाला प्रत्येकी चार आकाशकंदील तयार करून, ते जनता वसाहतीतील श्रमिकांच्या घरांवर लावण्यात आले.
उमेश उबरहंडे, यश इंगळे, जय केंगार, अभिषेक शेळके, शुभम सुतार, पारस खोपटकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. काही आकाशकंदील ‘निवारा’ वृध्दाश्रमाला भेट देण्यात आले. या उपक‘मामुळे विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा अनुभव मिळाला. श्रमिकांच्या चेहेर्यावरील आनंद व कृतज्ञतेचे भाव टिपता आले.
शाला समितीचे अध्यक्ष सुनील भंडगे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. मु‘याध्यापक नागेश मोने यांच्या मार्गदर्शनाखाली उपमु‘याध्यापिका मनिषा मिनोचा, पर्यवेक्षिका अनिता भोसले, रुपाली माळी, सुरेखा जोशी, सुरेश वरगंटीवार यांनी संयोजन केले.