नवीन मराठी शाळेत राष्ट्रीय एकता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक‘मासाठी श्री नितीन म्हसवडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक‘माच्या सुरुवातीस सर्व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या माननीय मु‘याध्यापिका सौ. कल्पना वाघ यांनी सर्वांना एकीचे बळ नेहमी श्रेष्ठच असते आणि म्हणूनच आपल्या संस्थेचे ब्रीदवाक्यही ‘एकी हेच बळ’ असे आहे हे सांगून सर्वांनी एकोप्याने राहा असा संदेश दिला.
शाळेतील शिक्षिका सौ. प्रिया इंदुलकर यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याची व गुजरात मध्ये उभारण्यात येणार्या स्टॅच्यू ऑङ्ग युनिटी ची सविस्तर माहिती विद्यार्थ्याना सांगितली आजच्या राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून शाळेत चित्रकला, पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवणे, भेटकार्ड, घोषवाक्य, कविता व एकतेतून किल्ले उभारणी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
शालासमिती अध्यक्ष डॉक्टर श्री. सुनील भंंडगे , ज्येष्ठ शिक्षक सौ. तनुजा तिकोने, श्री. धनंजय तळपे उपस्थित होते.