एशियन पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत 4 ब्राॅन्झ पदक विजेते भारतीय खेळाड़ू शाम सहानी यांचा सत्कार
पुणे -इंडोनेशिया येथे झालेल्या एशियन पाॅवर लिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला 4 ब्राॅन्झ मेड़ल मिळवून दिल्याबद्दल वेटलिफ्टर शाम सहानी यांचा युनिटी फाॅर फ्रीड़म फाउंडेशन व सिध्दार्थ ग्रंथालयातर्फे सन्मान करण्यात आला.यावेळी पुणे जिल्हा बाॅड़ी बिल्ड़ींग असो.चे अध्यक्ष बापू गानला,लष्करच्या पो.नि.वैशाली चांदगुड़े,सौ.पी.एस.सहानी,आयोजक भगवान वायाळ,विकास भांबुरे,दिलीप भिकुले,जमशेद करकरीया,संजय शर्मा,शाम अकोलकर,ललीत ड़ीड़्ड़ी,इसाक जाफर,विजय भोसले,महेश जांभूळकर,तुषार खेमकर,सौरभ परदेशी,आनंद पाटोळे,सरदार खान, मोहन नारायणे आदी उपस्थित होते.
इंडोनेशिया येथे पार पडलेल्या या स्पर्धेत आशिया खंडातील 16 देश सहभागी झाले होते.श्री.सहानी यांनी 93 कीलो वजनी गटात बेंच प्रेस,स्काॅट,ड़ेड़ लिफ्ट व मास्टर 2 या चारही प्रकारात भारताला 4 ब्राॅन्झ पदकांची कमाई करून दिली.58 वर्षीय सहानी हे फीशर जीम येथे सातत्याने सराव करत असुन कोच संजय शर्मा यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे.यावेळी श्री.सहानी यांना काॅमनवेल्थ स्पर्धेकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री.बापू गानला व सौ.चांदगुड़े यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर विकास भांबुरे यांनी सूत्रसंचालन केले व दिलीप भिकुले यांनी आभार मान