दहशतवादाविरुद्ध पुणेकरांची वज्रमूठ-सर्वपक्षीय कार्यकर्ते रविवारी काढणार दहशतवाद निषेध रेली…
पुणे- ए.टी.एस चे ए.सी.पी भानुप्रताप बर्गे यांना व त्यांच्या कुटुंबियाना उडवून टाकू अश्या आशयाचा ई-मेल आयसीस या दहशतवादी संघटनेकडून मुंबई पोलिसांना आला आणि पुण्यातील तरुणाई अस्वस्थ झाली. देशांतर्गत दहशतवाद्यांशी लढणारे बर्गे साहेबांसारखे धडाकेबाज अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना जर दहशतवादी धमकावणार असतील तर हे अधिकारी किवा पोलिस कर्मचारी एकटे नाहीत तर त्यांच्या पाठीशी सर्व नागरिक ठामपणे उभे आहेत हे दाखवून देणे गरजेचे आहे अश्या आशयाचा मेसेज संदीप खर्डेकर यांनी वरील पुणे विद्यार्थी चळवळ या ग्रुप वर टाकला आणि त्यावर मनसे चे प्रशांत कनोजिया यांनी त्वरित एक मोठी रेली काढावी असे सुचवून त्यादृष्टीने निरोप देण्यास व नियोजन करण्यास सुरुवात केली.अल्पावधीतच पुण्यातील विविध राजकीय पक्ष,संस्था,संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या ग्रुप वर प्रतिक्रिया यायला लागल्या व कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे भेटायचे ठरले.त्यानुसार मनसे चे प्रशांत कनोजिया,नगरसेवक राजू पवार,रवि बनसोडे,अमोल शिंदे,भाजप चे सरचिटणीस संदीप खर्डेकर,दिलीप उंबरकर,भाजयुमो चे अध्यक्ष गणेश घोष,अल्पसंख्यांक आघाडी चे सरचिटणीस सद्दाम शेख,समर्पण युथ फोरम चे पंकज काळे,उमेश भेलके,ऋषिकेश कुंबरे ,कोन्ग्रेस चे विशाल भेलके,शिवसेनेचे गजानन थरकुडे,राजेश पळसकर, पोलिस मित्र संघटनेचे जयराज लांडगे,राष्ट्रवादी कोन्ग्रेस चे इक्बाल शेख,महापेरेंट्स पालक संघटनेचे चे दिलीपसिंग विश्वकर्मा,बाबा चौकसे सारसबाग मित्र मंडळ,महाराष्ट्र नागरिक कृती समिती सुरेश जैन, पतित पावन संघटनेचे सीताराम खाडे,मनोज नायर,स्वप्नील नाईक,दिनेश भिलारे,अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे विश्वजीत देशपांडे,आनंद दवे,सामाजिक कार्यकर्ते नाना पाटील,सुदर्शन मित्र मंडळ चे श्याम मारणे ,नेक्स्ट जनरेशन चे बाबा शेख, यासह विविध पक्षातील कार्यकर्ते यांनी सावरकर स्मारक येथे बैठक घेऊन चर्चा केली.यानंतर सर्वानुमते रविवार दिनांक १७ जानेवारी रोजी दहशतवाद निषेध रेली चे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
त्यानुसार येत्या रविवारी दि.१७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता झांसी ची राणी चा पुतळा,बाल गंधर्व चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक कर्वे रस्ता येथे भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.काळ्या फिती लावून,दहशतवाद्यांच्या विरोधातील फलक हातात घेऊन ही निषेध रेली निघेल.सावरकर स्मारक येथे विविध मान्यवर आपले मनोगत व्यक्त करतील.
या रेली मध्ये सर्व पुणेकरांनी सहभागी होऊन दहशतवादाविरुद्ध आम्ही एक आहोत,आमच्या अधिकार्यांना किवा पोलिस कर्मचाऱ्यांना धमकावल तर ते एकटे नाहीत,त्यांच्या बरोबर आम्ही सर्व आहोत,हे दाखवून देण्यासाठी सर्वांनी या रेलीत सहभागी व्हावे असे आवाहन संदीप खर्डेकर,प्रशांत कनोजिया,गजानन थरकुडे,गणेश घोष,जयराज लांडगे,पंकज काळे,दिलीपसिंग विश्वकर्मा,यांनी केले आहे.
संपर्क-संदीप खर्डेकर ९८५०९९९९९५
प्रशांत कनोजिया ९८५०५२३९९९
गणेश घोष ९८५००४२१४१
जयराज लांडगे 9860555550
पंकज काळे 9881400355
दिलीपसिंग विश्वकर्मा 9890191753
गजानन थरकुडे 9822063144