अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ श्रीराम लागू यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ…
पुणे-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकास निधीतून पटवर्धन बागेतील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे स्प्रिंकलर बसविणे,योगासाठी ची शेड वाढवणे,नक्षत्र उद्यान अद्यावत करणे,पाण्याची लाईन टाकणे,यासह विविध विकास कामे करणे व सत्यवादी सोसायटी ते साकेत सोसायटी (डी पी रस्त्यापर्यंत ) येथे नवीन पदपथ करणे ह्या कामांचा शुभारंभ डॉ श्रीराम लागू ,सौ दीपा लागू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ वीणा हावनूरकर (मुख्याध्यापिका सिंबायोसिस शाळा) नगरसेवक
दीपक पोटे ,माधुरीताई सहस्त्रबुद्धे ,जयंत भावे भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,विविध सोसायट्यांचे पदाधिकारी
अंजलीताई रोडे,प्रमोद कुबेर,दत्तात्रेय डोइफोडे ,श्री सुनील भोसले ,सौ प्रज्ञा लोखंडे ,श्री अमित कदम,साकेत सोसायटीचे श्रीकांत पुजारी,बाळासाहेब धनवे,सुभाष ढावरे ,सुधीर फाटक,मयुर देशपांडे,ऋत्विज अघोर,सतीश मोहिते,सुनिल होलबेले,अजय काळे,दीपक इनामदार,सुजाताताई घाणेकर,संगीता आदवडे,हर्षदा फरांदे,ॲड प्राची बगाटे,अपर्णा लोणारे,सुशीला साठे,प्रमिलाताई फाले,माणिकताई दीक्षित,नारायण वायदंडे,रामदास गावडे,रवी आठवले,जयेश सरनौबत,चंद्रकांत भिसे,रमेश चव्हाण,जगदीश डिंगरे,देशमुखताई,दीपालीताई मगर,शेखताई इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ श्रीराम लागू यांच्या हस्ते कुदळ मारुन वरील कामांचे भूमीपूजन करण्यात आले तर दीपाताई लागू आणि वीणाताई हावनूरकर यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आला.
यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले की “पावसाळ्यात ह्या बागेत योगासने करणारे नागरिक,हास्यकल्बचे सदस्य व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असे ते डोळयासमोर ठेवुन बागेत विविध विकास कामांचे नियोजन केले आहे.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त जनसंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाच्या उद्यानात कामांचे भूमीपूजन होत आहे याचा मनस्वी आनंद होतो आहे.त्यातून डॉ श्रीराम लागूंच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होणे हा दुग्धशर्करा योग असून डॉ.लागू ह्या बागेत फिरावयास येतात त्यामुळे येथील कामे त्यांच्या उपस्थितीत होणे औचित्यपूर्ण असून या भागातील नागरिकांना पदपथाअभावी रस्त्यावरून चालताना मोठा त्रास सहन करावा लागत असे.आता हा पदपथ झाल्यावर येथील वाहतूकीस व पार्किंग ला शिस्त लागेल व अपघातांचे प्रमाण ही कमी होइल.तसेच डॉक्टर व दीपाताईंच्या सूचनेनुसार बागेसमोर ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पेडेस्ट्रीयन क्रॉसिंग केले आहे याचा ही त्यांनी उल्लेख केला.
यावेळी संदीप खर्डेकर यांनी डॉ लागूंचे स्वागत केले व “या सूर्य पाहिलेल्या माणसाच्या हिमालया येवढी सावली आम्हाला लाभली असुन कायम गैर गोष्टींच्या विरोधात सामना करणारे डॉक्टर सर्वसामान्य माणसाच्या ह्रदयातील पिंजऱ्यात सिंहासनावर विराजमान झालेले नटसम्राट आहेत” असे सांगताच डॉक्टरानी त्यास दाद दिली.१९९८ साली डॉक्टर लागू यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभाग घेउन उपोषण केले होते व त्यावेळी मी ही त्यांच्या समवेत होते अशी आठवण ही खर्डेकर यांनी सांगितली.प्रकृती अस्वास्थ्य असताना ही डॉक्टर कार्यक्रमास उपस्थित राहिले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी वयाचे शतक पूर्ण करावे अशी शुभेच्छा ही खर्डेकर यांनी दिल्या.
यानंतर डॉक्टर श्रीराम लागू यांनी अत्यंत प्रसन्नचित्तपणे आपण बोलणार असल्याचे सांगितले.ते म्हणाले,मला वयोमानाप्रमाणे खूप वेळ थांबता येत नाही,दम लागतो असे सांगतानाच घरातून ह्या बागेत आल्यावर किती प्रसन्न वाटते,आम्ही या भागात राहतो याचा मला अभिमान वाटतो,लोकप्रतिनिधींनी वेडीवाकडी कामे करण्यापेक्षा मंजुश्री खर्डेकर यांच्या प्रमाणे लोकोपयोगी कामे करावीत व नागरिकांच्या मागणी प्रमाणे व गरजेनुसार विकास कामे करावीत,मी त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो.आपल्या भोवती असे हिरवेगार असले की मन प्रफुल्लित होते असे ही ते म्हणाले “आणि मी नव्वद वर्षाचा नसून एकोणनव्वद वर्षांचा असल्याचे ही त्यांनी मिस्किलपणे सांगितले.दीपाताई लागू म्हणाल्या ” आम्ही येथे नेहमीच फिरायला येत असतो आणि मंजुश्री खर्डेकर यांनी आमच्या हस्ते ह्या बागेतील व भागातील विकास कामांचे भुमीपूजन केले याचा मला आनंद वाटतो.आम्हाला या कामाचा एक भाग होता आले याबद्दल मंजुश्रीचे आभार.” यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी ८९ वर्षाच्या डॉक्टर लागू ना शतक पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले,मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर दीपक पोटे व जयंत भावे यांनी मनोगत व्यक्त केले.