सुवर्णरत्नं गार्डन सोसायटीचा आदर्श गणेशोत्सव – पर्यावरणपुरक पद्धतीने गणेश विसर्जन
पुणे-संपूर्ण सोसायटीतील कचरा सोसायटीतच जिरविणारा कचरा विघटन प्रकल्प,सर्व इमारतींना रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्प, या पाठोपाठ आम्ही आमच्या सोसायटीच्या गणरायांचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करून अन्य गृहसंकुलांसमोर एक आदर्श निर्माण केलाय असे कर्वेनगर येथील 200 सदनिका असलेल्या सुवर्णरत्न गार्डन सोसायटीच्या अध्यक्ष व शिक्षण मंडळ सदस्य सौ मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.
गणेशोत्सव तर कोणालाही त्रास होणार नाही अश्या पद्धतीने येथे साजरा केला जातोच,यात मुलांच्या स्पर्धा,करमणुकीचे विविध दर्जेदार कार्यक्रम,भक्तिभावाने शास्त्रोक्त पूजा व आरती,तसेच विविध गुणदर्शन अश्या कार्यक्रमांनी नटलेल्या आमच्या गणेशोत्सवात यावर्षी गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याची सूचना केली व सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यास पाठींबा दर्शविला.त्यानुसार पुणे मनपा ने एन सी एल व कमिन्स इंडिया च्या सहकार्याने सुचविलेल्या पद्धतीने म्हणजेच एका मोठ्या टब मध्ये पाण्यात अमोनियम बायकार्बोनेट मिसळून त्या मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्त्ती विसर्जित करण्याची पद्धत अवलंबिली,असे सौ खर्डेकर यांनी स्पष्ट केले.या वेळी सोसायटीचे उत्सव प्रमुख चंद्रकांत बारटक्के,सचिव स्मिता ढवळीकर,सौ छाया सोनावणे,सौ सरोज कुलकर्णी व अन्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.यापासून प्रेरित होऊन अनेक सभासदांनी आपल्या घरचा गणपती हि अश्याच पद्धतीने विसर्जित केला.
मी माझ्या घरी स्वहस्ते शाडू च्या मूर्तीपासून तयार केलीली मूर्ती प्रस्थापित केली होती,त्यास माझ्या कन्येने प्रणेतीने नैसर्गिक रंग दिला व आम्ही घरीच बादलीत या मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला.असे सांगतानाच सौ खर्डेकर यांनी पुढील वर्षी जास्तीत जास्त लोकांना शाडूच्या मातीचा गणपती घरच्या घरी तयार करण्यास प्रशिक्षण देण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.उत्सव साजरा करताना प्रदूषणावर नियंत्रण आणणे व पर्यावरणपूरक उतरावं साजरा करणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य असल्याचे ही सौ मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.