पुणे-सनबर्न उधळून लावू… असा इशारा संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी दिला आहे .
शिंदे यांनी यासंदर्भात म्हटले आहे कि,सनबर्न फेस्टिव्हल’ रद्द करावा… या मागणीसाठी पुणेकरांचा संघर्ष सुरू आहे. हा दारूड्या संस्कृतीचा व आमली पदार्थांचा खुला बाजार आहे. हा सरकार पुरस्कृत अश्लिल पाश्चात्य संस्कृतीचा उदो उदो आहे. तो थांबला पाहिजे. हा समाजविघातक सनबर्न फेस्टिव्हल दि. २९ ते ३१ डिसेंबर २०१८ रोजी लवळे, पुणे येथे होणार आहे. परंतु सनबर्न फेस्टिव्हला लवळे ग्रामपंचायची अजून परवानगी नाही… मग सनबर्न रद्द करा…अशी मागणी पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड च्या संतोष शिंदे यांनी केली आहे .
शिंदे यांनी असे म्हटले आहे कि,लवळे गावाच्या ग्रामसेवकांनी आज पत्र दिलेले आहे. त्यात त्यांनी सनबर्नला आम्ही परवानगी दिलेली नाही असे म्हटले आहे . म्हणजे सनबर्न फेस्टिवल बेकायदेशीर आहे. यासाठी श्री. राहूल मस्के व अनूप मारणे प्रत्यक्ष भेटून पाहणीकरून लेखीपत्र घेतले आहे. तरी सनबर्न चे काम सुरू आहे व Book my Show वर Online booking सुरू आहे. यामुळे हजरों लोकांची लाखों रूपयांची फसवणूक होणार आहे.
सनबर्न फेस्टिव्हल’ शेजारी पाच फुटावर ८०० मुलींचे हॉस्टेल आहे. सनबर्न’ला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री १० वा. बंद केले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते. सनबर्न फेस्टिव्हल मध्ये रात्रभर अमली पदार्थाचे प्रचंड सेवन व वापर होत असतो. यामुळे तरूण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरूण मुले मुली दारू पिऊन व आमली पदार्थाचे सेवन करून दररोज धिंगाना करत फिरतात. कोर्टाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून चार स्पिकर लावून, वेळेची मर्यादा पाळून आदेश पाळले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलवर कोणतेही नियम व अटी पाळले जात नाहीत. बेकायदेशीर मद्य विक्री व अमली पदार्थाची विक्री केली जाते. यावर आमचा आक्षेप आहे. म्हणून सरकारने परवानगी देऊन नये. नियोजित सनबर्न फेस्टिव्हलला पाठीशी न घालता तो रद्द करावा. आम्ही बेकायदेशीर सनबर्न उधळून लावू. असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे..