पुणे शहर हद्दीतील व्यवसाय करणाऱ्या चालक व मालकांनी १ दिवस पुणे बंदोबस्तासाठी दिल्यास आपण किमान १००० पेक्षा जास्त सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवक देऊ शकतो. गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच वेळी येत असल्याने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सणादरम्यान कोणतेही गालबोट लागू नये,अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी आपण जनतेची सेवा म्हणून देशसेवा करू शकतो.
बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने कडेकोट व्यवस्था केली असून, संपूर्ण यंत्रणाही सज्ज आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी, गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी दुपारपासून पुणे शहरामध्ये लाखो भाविक गर्दी करतील. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि घातपाती कृत्य करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यास पोलीस दल सज्ज आहे. आपले उत्तरदायित्व किंवा उपकाराची परतफेड म्हणून सर्व परवानाधारक खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या मालकांनी आपले किमान २ ते ४ असे प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी पोलीस दलाच्या ताफ्यात देवुन त्याच्या आदेशाचे पालन करतील.
बंदोबस्तातील नियमनासाठी दहशतवादाचा धोका, पाकीटमार, मोबाईल चोर, शांततेचा भंग करणारे टोळके, सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट व भुरट्या चोरांचा उच्छाद या सा-या गर्तेत सुरक्षा यंत्रणेला हे मोठे आव्हान आहे त्यात ट्रॅफिक वॉर्डन, फायर वॉर्डन, रोड रोमिओंवर आळा घालण्यासाठी रक्षकांच्या माध्यमातून स्वयंसेवकांची फळी सज्ज करून पोलिसांच्या मदतीला आपण उभे राहिले पाहिजे. आपण एक आदर्श नागरिक म्हणून आपला सहभाग वाढवला पाहिजे. सालाबादप्रमाणे पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असले तरी यंदाच्या बंदोबस्तात नाविण्यपूर्ण यंत्रणांचा समावेश असला तरी पण अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे.
गणेशोत्सवात शहरात येणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी आपण मालकांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे त्यात पुणे पोलिस,सशस्त्र दलाचे जवान, होमगार्ड, वाहतूक रक्षक, जलसुरक्षा दलाचे जवान, एसआरपीएफ, फोर्स वनचे जवान, वाहतूक पोलिसांच्या मदतीला आपले स्वयंसेवक सज्ज ठेवण्याची गरज आहे. शहरातील अतिसंदेवनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्या ठिकाणी जे आजी माजी सैनिकी, पोलीस अधिकारी आणि तसेच महाविद्यालयीन आजी माजी एन.सी.सी कॅडेट सह आपण स्वतः पोलिसांच्या मदतीला उभे राहिले पाहिजे.
खाजगी सुरक्षा रक्षक हे गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, मॉल, हॉटेल अँड रेस्टोरंट-पब, सर्व प्रकारची दुकाने, आय टी कंपनी, खाजगी बंगले, बँक- ए. टी. एम, सर्व प्रकारची ऑफिस, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, उद्याने, सार्वजनिक पे अँड पार्क पार्किंग, कॉमेर्सिअल कॉम्प्लेक्स, ज्वेलरी शॉप, बिग बाजार, डी मार्ट, सिनेमा गृह, शासकीय निमशासकीय संस्था, सरकारी कार्यालय, कारखाने, औद्योगिक वसाहत, विविध बाजारपेठ इ. ठिकाणी खाजगी सुरक्षा कर्मचारी सुरक्षा रक्षक काम करतात त्या सर्व ठिकाणच्या सर्व मुख्य नियुक्ताने त्यांच्या कडील जी सिक्युरिटी एजन्सी कामकाज पाहते त्यातील किमान २ तरी सुरक्षा गार्ड बंदोबस्तासाठी दिल्यास हि पण एक देशसेवा आहे त्यातून आपले पुणे आपण स्वतः सुरक्षित करू शकतो. गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, विशेष सुरक्षा पुरविण्याच्या कामी आवाहन करतो.
संपर्क:- सचिन मोरे भारत शिल्ड फोर्स (संस्थापक) 9623612463