रामदेव बाबा यांचा सूर्यदत्ताकडून ‘सूर्य रत्न’ देऊन सन्मान
पुणे : दरवर्षीप्रमाणे सूर्यदत्ता शिक्षणसंस्थेतर्फे योगगुरु डॉ. रामदेव बाबा यांना ‘सूर्यरत्न – आधुनिक युगाचे संत’ असे सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवन गौरव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्राणायाम विज्ञान, आयुर्वेद विज्ञान तसेच आध्यात्मिक विषयावर असलेले प्रचंड ज्ञानामुळे रामदेव बाबांनी भारतीय जनतेसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या गोष्टीची दाखल घेऊन सूर्यदत्ता शिक्षणसंस्थेने रामदेव बाबा यांना ‘सूर्य रत्न’ या गौरवाने सन्मानित केले.
यावेळी योगगुरु डॉ. रामदेव बाबा यांनी लोकांना स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले, तसेच आयुर्वेद आणि योगा यांचा आयुष्यात नियमित अवलंब केल्यास आरोग्य निश्चितच उत्तम राहील असेही ते म्हणाले.
यापूर्वी, सूर्यदत्त शिक्षण संस्थेतर्फे पद्मविभूषण कै. बाबा आमटे, भारतरत्न कै. भीमसेन जोशी, पद्मविभूषण बीकेएस अय्यंगर, पद्मविभूषण डॉ. सुंदरलालजी बहुगुणा, ऋषी श्री प्रभाकरजी, श्री स्वामी चिदानंद सरस्वतीजी, वाणी भूषण प्रीती सुधाजी महारसाहेब, आचार्य डॉ. लोकेश मुनीजी आणि पद्मविभूषण डॉ आर. के. लक्ष्मण यांना ‘सूर्य रत्न’ जीवनगौरव प्रदान करण्यात आले होते.