पुण्यात पावसाची उघडीप -धरणातील विसर्ग ४५ हजारांवरून ९४१६ क्युसेस वर ..रेड अलर्ट चे हसे …
पुणे- पुणे सांगली, सातारा ,कोल्हापूर येथे आणि नाशिक मध्ये पावसाने थैमान घातले असताना आज पुण्यात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली. काल काहीजणांनी आज पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला होता त्याचा चक्क फज्जा उडाला . काल रात्री पासून खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत होता आज सकाळी ९ वाजता देखील तो वाढवून ४५ हजार क्युसेस वर नेण्यात आला . पण पावसाने उघडीप दिल्याने दुपारी २ वाजता तो कमी करून ३९ हजार क्युसेस वर नेण्यात आला आणि हळू हळू कमी होत तो आज रात्री साडेआठ वाजता १८ हजार ४९१ तर रात्री १० वाजता ९४१६ एवढा विसर्ग करण्यात येत होता ..तस तसे नदीतील पाणीपातळी रात्री कमी कमी होत गेली .