पुणे-एकीकडे इव्हीएम वर संशय व्यक्त होत असताना ,आणि संशयाचे वातावरण असूनही इव्हिएम लादले जात असल्याचे दिसत असताना मतमोजणीपूर्वीच ‘गुड घ्या ला बाशिंग ‘बांधणे खरे तर योग्य नाही ,अशात मोजणी कर्मचार्यांमध्ये बापट अन्नधान्य मंत्री असल्याने त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश नको अशी भूमिका कॉंग्रेसचे मोहन जोशी यांनी घेतली असताना दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्ताने २६ तारखेला होणाऱ्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण देणाऱ्या फलकावर विशेष उपस्थिती म्हणून खासदार गिरीश बापट असा उल्लेख करण्यात आला आहे .विशेष म्हणजे अनिल शिरोळे यांच्या नावासमोर हि खा .अशी उपाधी लावलेली आहे .
आता मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले आहेत. पुण्यात भाजपाकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीकडून मोहन जोशी यांच्यात लढत आहे. एकीकडे निकाल काय लागेल याची उत्सुकता असताना पुणे शहरात आधीच गिरीश बापट यांच्या नावे बॅनर झळकत असून त्यावर खासदार असा उल्लेख असल्याने शहरभर चर्चा सुरू झाली आहे.आम्हाला विजयाची खात्री असल्याने खासदार असा उल्लेख केल्याचा दावा भाजपचे नेते कार्यकर्ते करतील पण निवडणूक आयोग (अर्थात ते हि संशयाच्याच भोवऱ्यात आहे ) त्यावर कारवाई करेल काय ? केली तर कोणती कारवाई करू शकेल ? अशा मुद्द्यांवर नाहक चर्चा घडून येते आहे.एक्झिट पोल आणि असे प्रकार लोकांची मानसिकता तयार करण्याच्या कामाला जोरदार पाने लागल्याचेच यातून दिसते आहे .उद्या जर हे पोल खरे ठरले तर ते बढाया हि मारतील यात शंका नाही.
देशभरात यंदा सात टप्प्यात निवडणूक पार पडली. तर या निवडणुकीदरम्यान भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना पहावयास मिळाले. पुणे लोकसभा मतदारसंघातील लढाई भाजपा आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असल्याने सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीकडून अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर अखेर मोहन जोशी यांना संधी देण्यात आली होती.
या निवडणुकीच्या कालावधीत गिरीष बापट आणि मोहन जोशी यांनी आपणच मताधिक्याने निवडून येणार असे दावे केले. दरम्यान उद्या म्हणजेच गुरुवारी नेमकं कोण निवडून येणार हे स्पष्ट होईल. या मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले असताना पुण्यात एका रक्तदान शिबिराचा लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर गिरीश बापट यांचा खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्या फ्लेक्सवरून शहरातील सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे.