गीतकार मजरूह सुलतानपुरीची रचना ‘;तेरी बिंदिया रे ‘; स्नेहल भाटकरांचे ‘;रूप पाहता लोचनी’सुधीर फडके यांचं ‘;चंद्र आहेसाक्षीला’आणि सी रामचंद्र यांचे ‘ये जिंदगी उसीकी है’. या स्त्री सौंदर्य स्तुती आणि प्रेमी आणि प्रेमिके मधले ‘प्रेम मिलाप’ आणि
‘विरहाचा गोड संगम’ आणि ‘लेकीन पहले दे दो मुझको मेरा पाच रुपय्या बारा आना’ आणि ‘;माळ्याच्या मल्या मध्ये कोण ग उभी’अशा खोडकर आणि ठेका धरायला लावणाऱ्या गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली
जेष्ठ संगीतकार सी रामचंद्र, सुधीर फडके, नौशाद अली, स्नेहल भाटकर, राम कदम व गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्याजन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य वाद्य वृन्दासह हिंदी, मराठी भाषांच्या ‘सुहाना सफर’; कार्यक्रम जेष्ठ गायक जितेंद्र भूरूक वसहकाऱ्यांनी पुणे फेस्टिव्हल अंतर्गत सादर केला .
सी रामचंद्र यांची अजरामर संगीतरचना ‘आधा है चंद्रमा रात आधी’; तसेच जेष्ठ संगीतकार नौशाद अली यांच्या ‘;मधुबन मेराधिका नाचे रे’आणि गीतकार व शायर मजरूह सुलतानपुरीच्या उडत्या चालीचा ‘;पहले मुझको दे दो मुझको मेरा पाच रुपय्या बाराआना’आणि प्रसिद्ध गझल’;हम है माताए’सादर करून रसिकांची दाद मिळवली. तसेच राम कदम यांची लावणी ‘जाता साताऱ्याला’आणि ‘एक लाजरा न साजरा मुखडा’अशा लावण्यांनी रसिकांना ठेका धरयला लावला आणि मंत्रमुग्ध केले.
रंगल्या मैफिली पुणे फेस्टिव्हलच्या …(व्हिडीओ)
पुणे-पुणे फेस्टिव्हलमध्ये श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे गायक जितेंद्र भूरूक व सहकलावंतांनी ’गोल्डन इरा ऑफ म्युझिक’ हा कार्यक्रम सादर केला .जेष्ठ संगीतकार सी.रामचंद्र, सुधीर फडके, नौशाद अली,स्नेहल भाटकर, राम कदम व गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त भव्य वाद्यवृंदासह हिंदी मराठी गाण्यांचा सुहानासफर कार्यक्रम सादर केला
या प्रसंगी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,कृष्णकुमार गोयल,श्रावणक्वीन तन्वी माने,दिग्दर्शक देवेंद्र शिंदे, दिग्दर्शक प्रशांत गिरकर, युनायटेड नेशन्स ग्लोब डॉ.राधिका वाघ आदी उपस्थित होते