के. व्येंकटेशम आणि साहेबराव पाटील यांच्याबद्दल पोलीसदलात सकारात्मक चर्चा
पुणे :भल्याभल्यांना नडून अडवणारे -वादग्रस्त अशी ख्याती असलेल्या ,आणि सहाय्यक पोलीस आयुक्तापेक्षाही स्वतःचे मोठे वर्चस्व निर्माण केलेल्या पुण्यातील वादग्रस्त पोलीस हवालदार शैलेश हरीभाऊ जगताप ,परवेज शब्बीर जमादार यांना निलंबनाची ‘दिवाळी भेट ‘ मिळाली आहे .किंग ऑफ पुणे ,”गनमॅन” पुण्याचा सिंघम ;अशा उपाध्या जगताप ज्याला त्याच्या चाहत्या वर्गाकडून लावण्यात येत होत्या .त्याच्या भावाच्या आत्महत्येप्रकरणी थेट माजी उपमहापौर आणि राजकारणात मोठी हस्ती असलेल्या ,जनशक्तीचा मोठा प्रवाह पाठीमागे असलेल्या दीपक मानकर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाजी ,आणि त्यानंतर जामिनावर ते सुटण्याच्या स्थितीत असताना पुन्हा त्यांच्यावर एकामागून एक असे 2 गुन्हे दाखल करण्यात आले .या स्थितीत जगताप याचा गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात सुद्धा दबदबा प्रचंड वाढला असताना पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केल्याने पोलीस दलात एकच चर्चा उसळली आहे.
पोलिस दलातील नोकरीचा दुरुपयोग करुन जमिनीच्या व्यवहारामध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरुन “गनमॅन” म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या पोलिस हवालदार शैलेश जगताप यांच्यासह परवेज यापोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) साहेबराव पाटील यांनी दिला आहे. लष्कर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलिस कर्मचारी शैलेश हरीभाऊ जगताप आणि गुन्हे शाखेत नेमणुकीस असलेल्या परवेज शब्बीर जमादार या दोघाचे निलंबन करण्यात आले असल्याचे आदेशात नमुद केले आहे.
जगताप यांनी आपल्या कामाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाउन स्वत:च्या वैयक्तिक व आर्थिक फायद्यासाठी नीलमणी धैर्यशील देसाई यांच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये सहभाग घेतला. त्याचबतोबर जगताप यांनी रोख रक्कम, दुचाकी गाडी, ब्रैंडेड कपडे स्वीकारल्याचे पोलिस प्रशासनाने केलेल्या अंतर्गत चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिस कर्मचारी असुनही खोटी व वरिष्ठची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचे आदेशात नमुद केले आहे. जगताप यांच्या बेशिस्त व बेजबाबदार वर्तनामुळे पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे, त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शैलेश जगताप हे जितेंद्र जगताप यांचे भाऊ आहेत. जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मानकर सध्या कारागृहात आहेत. जगताप यांना आतापर्यंत १७५ बेकायद गन आणि पिस्तूल पकडून दिल्याचे सांगण्यात येते. गेली अनेक वर्षे क्राइम ब्रॅंचशी संबंधित असल्याने त्यांच्याबद्दल विविध चर्चा पोलिस वर्तुळात झडत होत्या. अनेक राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून जगताप यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते, याचीही चौकशी होणार का, याची आता उत्सुकता आहे. पोलिस आयुक्त के. व्येंकटेशम यांनी अशा कर्मचाऱ्यावर थेट कारवाई केल्याने पोलिस दलात आयुक्तांबद्दल सकारात्मक चर्चा सुरु झाली आहे.
माझा भाऊ जितेंद्र याच्या आत्महत्या प्रकरणी राजकीय दबावापोटी मला त्रास दिला जात होता. त्याबाबत माझ्या पुतणीने पोलिस आयुक्तकडे अर्जही केला आहे. त्यानंतरही निलंबन करण्यात आले आहे. राजकीय सुडबुद्धिने का प्रकार करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया शैलेश जगताप यांनी दिली.
पहा या हवलदार जगताप चे फोटो –