पुणे- तब्बल 1 लाख ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र महिलेच्या गळ्यातून हिसकावून पळवून नेण्यात आल्याची घटना पुण्यातील गजबजलेल्या सिंहगड रस्त्यावर घडली .
सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हि घटना पार्श्व विहार सोसायटी ,मेन गेट समोर ,आनंद नांगर सनसिटी.. येथे घडली . मंदा सोनवणे हि ५८ वर्षीय महिला येथून जात असताना मोटारसायकल वरून आलेल्या दोघा भामट्यांनी तिच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले .पोलीस उपनिरीक्षक साळुंके याप्रकरणी अधिक तपास करीत असून त्यांचा संपर्क क्रमांक 7020684710 असा आहे .