पुणे-शहर कॉंग्रेस च्या वतीने आज लष्कर परिसरातील म.गांधी रस्त्यावरील कोहिनूर चौकात महागाई विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली . शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने येथे मोठा पोल्स बंदोबस्त ठेवण्यात आला होता . राज्य राखीव दलाच्या जवानांची तैनात आणि अनेक पोलीस अधिकारी यांच्या गर्दीत हि मोठ्या संख्येने आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तेवढीच जोरदार निदर्शने केली .माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड ,म.वि .अकोलकर, कॉंग्रेसचे महापालिकेतील गट नेते अरविंद शिंदे,अविनाश बागवे, चांदबी नदाफ, रशीद शेख ,रफिक शेख,विठ्ठल थोरात,राजूशेठ डांगी, अजित दरेकर ,मनीष आनंद ,हाजी नदाफ ,सुरेखा खंडागळे ,हसन कुरेशी,प्रदीप परदेशी,उस्मान तांबोळी ,सादिक कुरेशी,मंजूर शेख ,नरुद्दीन सोमजी ,माल्मिक जगताप ,मधुकर चांदणे ,रमेश सकट,शानी नौशाद आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .पहा या आंदोलनाची एक व्हिडीओ झलक …