पुणे
पुणे रनिंग बियॉन्ड मायसेल्फ (पीआरबीएम)ने अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय)च्या सहकार्याने पूनावाला क्लीन सिटी मॅरेथॉन (पीसीसीएम)च्या विजेत्यांचा गौरव केला. मॅरेथॉनला १४००० पेक्षा जास्त नोंदणींसह अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याचे उद्घाटन आयर्न मॅन मिलिंद सोमण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एपीसीसीआय, कृष्णन कोमांडूर यांच्या हस्ते पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी येथे करण्यात आले. पीसीसीएमने शारीरिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणारा संदेश दिला आणि पुणेकरांना आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले.मॅरेथॉनच्या रूटला एम्सने प्रमाणित केले असून महाराष्ट्र एथलेटिक्स असोसिएशनने अधिस्वीकृती दिली आहे. या उपक्रमातून पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य दिले गेले आणि त्यातून सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या गरजेवर भर दिला गेला. तसेच पुणे महानगरपालिका, स्वच्छ भारत सर्वेक्षण आणि पुणे स्मार्ट सिटी या प्रकल्पांनाही पाठिंबा दिला गेला.