‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ च्या बी. फार्म अभ्यासक्रमास एन.बी.ए. बोर्डाकडून अधीस्वीकृती
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ च्या बी. फार्म अभ्यासक्रमास ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडिटेशन’ (नवी दिल्ली ) कडून अधीस्वीकृती (अॅक्रीडिटेशन) मिळाली आहे. ही अधीस्वीकृती ३ वर्षांकरिता (जून २०१७ ते जून २०२०) आहे.
या प्रित्यर्थ आझम कॅम्पस येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. एम.डी.बुरांडे (अध्यक्ष आय.पी.ए. कम्युनिटी फार्मसी डिव्हिजन) प्रमुख पाहुणे होते. हा कार्यक्रम डॉ. ए आर. शेख असेम्ब्ली हॉल मध्ये झाला.
एम. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. सोहन चितलांगे, डॉ. साधना शाही हे मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. दिलनवाझ पठाण यांनी आभार मानले. विद्यार्थी, प्राध्यापक, पालक उपस्थित होते.