गुरुपौर्णिमेनिमित्त नृत्य परंपरेचा घडला अनुग्रह !
तंजावूर राजघराण्याकडून डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांचा सत्कार
पुणे :गुरुपौर्णिमेनिमित्त ‘कला वर्धिनी’ चॅरिटेबल ट्रस्ट ‘तर्फे १६ जुलै रोजी ‘अनुग्रह ‘ हा नृत्य कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्य गुरु डॉ . सुचेता भिडे -चापेकर यांच्या १० शिष्यानी नृत्य सादर करून गुरुवंदना दिली ! तर डॉ . सुचेता भिडे -चापेकर यांनी गुरु संकल्पनेवर नृत्य सादर करून शिष्यांवर ‘अनुग्रह’ केला !
‘तंजावूर नृत्य प्रबंध’ ही विशेष नृत्य संकल्पना ‘अनुग्रह ‘ या कार्यक्रमात सादर करण्यात आली . कर्नाटकच्या तंजावूर राजघराण्याच्या मराठी नृत्य परंपरेचे विलोभनीय दर्शन
या कार्यक्रमातून घडले.प्रताप सिंहराजे यांनी सुचेता भिडे -चापेकर यांचा सत्कार केला.
डॉ . सुचेता भिडे -चापेकर यांची कन्या ,शिष्या आणि ‘कला वर्धिनी’ चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव अरुंधती पटवर्धन यांनी स्वागत केले . तंजावूर राजघराण्याचे १४ वे वंशज प्रतापसिंहराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून या कार्य्रक्रमाला उपस्थित होते.
. अंजली बागुल,धनश्री,आपटे,केतकी शेणोलीकर,तेजश्री अडीगे,केतकी नेवपुरकर,शिल्पा देशमुख,लालन देसाई,सायली काणे,अरुंधती पटवर्धन,या शिष्यांनी सहभाग घेतला.वैभवी जोगळेकर यांनी यांनी निरुपण केले.डॉ . सुचेता भिडे -चापेकर यांच्या ‘गुरु ‘ संकल्पनेवरील नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली . ‘अनुग्रह ‘ चे हे सहावे वर्ष होते
व्यंकोजीराजे, शहाजीराजे, सरफोजीराजे यांनी तंजावरच्या प्रांतात कलांना, परंपरांना प्रोत्साहन दिले. रसिक, कलाविज्ञ, नाटककार अशी या घराण्याची ख्याती आहे. या घराण्याने नृत्य संगीताची नवनिर्मिती केली. त्याचे विलोभनीय दर्शन या कार्यक्रमात घडले.
‘ तांडवनृत्य करी गजानन ‘, यासह शहाजीराजांच्या रचनांवर नृत्य रचना ‘ कृष्णा ‘ , ‘ लाजेस लाज नाही ‘ देखील सादर करण्यात आल्या.सरफोजी महाराज यांच्या रचनाही दाद मिळवून गेल्या. सरफोजी राजांचा तिल्लानाही सादर करण्यात आला.
‘ डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांनी तंजावूर नृत्य परंपरा पुढे आणण्यासाठी, त्याचे दस्तावेजी करण करण्यासाठी १९६० पासून प्रयत्न केले ते महत्वपूर्ण आहेत. ‘ तंजावूर नृत्य प्रबंध ‘ हा अतिशय उत्तम कार्यक्रम असून त्यांनी तंजावूरला येऊन ‘ संगीत महाल ‘ पॅलेस मध्ये सादर करावा ‘, असे उद्गार प्रतापसिंहराजे यांनी काढले.
‘ जीव- शिवाचे अद्वैत मानणारे तंजावूर राजघराण्याने कला -परंपरा जपण्याचे अलौकिक सांस्कृतिक कार्य केले आहे. स्वतःचे व्यक्तिमत्वाची ओळख करुन ज्ञानाची कवाडे गुरू उघडतो. गुरु -शिष्य परंपरा ही देशाचे भूषण असून ती पुढे नेली पाहिजे. ‘ असे मनोगत डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांनी व्यक्त केले.
शिवप्रसाद (गायन ), श्रीराम ( मृदंग ), बालसुब्रमण्यम् (व्हायोलिन ) यांनी साथसंगत केली. त्यांचा सत्कार प्रताप सिंहराजे यांनी केला.सुचेता भिडे -चापेकर यांचा सत्कारही त्यांनी केला.