पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड युथ स्किल्स डे ‘ साजरा करण्यात आला . ‘आयआयटी मुंबई ‘,तसेच ‘स्वयम ‘ च्या स्किल डेव्हलपमेंट विषयक विविध अभ्यासक्रमांचे उदघाटन प्राचार्य डॉ शैला बुटवाला यांच्या हस्ते करण्यात आले . डॉ एम जी मुल्ला ,प्रा रईसा शेख ,प्रा . सलाउद्दीन सज्जन उपस्थित होते . वाणिज्य विभागाचे शंभर विद्यार्थी उपस्थित होते .हा कार्यक्रम १५ जुलै रोजी आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) येथे झाला .