पुणे :
हाज यात्रेला जाणाऱ्या पुण्यातील यात्रेकरुंचा सत्कार ‘ अवामी महाज ‘ सामाजिक संस्थेकडून करण्यात येणार आहे.दंत महाविद्यालय,आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) येथे, ११ जुलै, ११ वाजता हा सत्कार कार्यक्रम डॉ.पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे . ‘अवामी महाज ‘ चे सचिव वाहिद बियाबानी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली