पुणे :’महाराष्ट्र गांधी स्मारक निधी'(गांधीभवन ) तर्फे सोमवार ,२० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ‘रोझा ईफ्तार ‘ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी आणि सचिव अन्वर राजन यांनी पत्रकाद्वारे दिली.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु असून उपवास सोडण्यासाठी रोझा इफ्तार ‘चे आयोजन केले जाते . सर्व धर्मियांचे धार्मिक प्रसंग एकत्र साजरे करून सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘तर्फे सर्वधर्मीय नागरिक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम आयोजित करीत आहे . या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे . पुणे ,कोथरूड ,वारजे परिसरातील मुस्लिम बांधव ,मशिदीचे पदाधिकारी निमंत्रित करण्यात आले आहे. गांधीभवन (कोथरूड ) येथे हा कार्यक्रम होईल .
या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के .व्यंकटेशन ,’लिज्जत पापड ‘ संस्थेचे सुरेश कोते,पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित राहणार आहेत . डॉ कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत .