डॉ. बाळकृष्ण दामले यांना ‘ नेल्सन मंडेला शिक्षारत्न सन्मान’
पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रात (ईएमएमआरसी) विभागातील डॉ. बाळकृष्ण दामले यांना ‘भारतरत्न नेल्सन मंडेला शतवार्षिकी शिक्षारत्न शिखर सन्मान’ प्राप्त झाला आहे.
विवेकानंद एज्युकेशनल ,कल्चरल ,स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (पश्चिम बंगाल)कडून हा पुरस्कार दिला जातो. शैक्षणिक क्षेत्रातील ऑडिओ -व्हिज्युअल टिचिंग टेक्नॉलॉजी या विषयातील योगदानाबद्दल डॉ. बाळकृष्ण दामले यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. डॉ.दामले हे फुलब्राईट स्कॉलर असून लघुपट ,नाटिका ,माहितीपट माध्यमातून अद्यापनाच्या पद्धतीवर त्यांनी संशोधन केले आहे.