केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्रात प्रशिक्षण
पुणे :खादी ग्रामोद्योग आयोगाच्या केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण केंद्र(पुणे ) येथे कृषी विभागाच्या ‘आत्मा ‘ प्रकल्प कार्यक्रमांतर्गत अंदमान -निकोबार ,ओरिसा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तुकडीचा प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच १८ ते २२ मार्च दरम्यान पार पडला . मधुमक्षिका पालनातील नवे तंत्र ,राणीमाशीची कृत्रिम निर्मिती ,रोग ,नियंत्रण ,अधिकाधिक मध उत्पादन याची माहिती देण्यात आली .साधना सरपोतदार ,नवनाथ शितोळे ,संतोष मनोहर ,किशोर मराठे ,ओंकार पुजारी ,सागर कुदळे सहभागी झाले . कृषी विभागाचे श्री . उसुफ यांनी मार्गदर्शन केले . संशोधन केंद्राचे सहसंचालक सुनील पोकरे ,हेमराजसिंह मुवेल ,यांच्याहस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली .
आर जी बोबडे ,एन आर भिलारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले . प्रशिक्षणार्थीना मधमाशा वसाहती आणि सामग्री केंद्रातर्फे देण्यात आली