दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेला ७ जिल्ह्यातून प्रतिसाद
पुणे :’ ग्रामीण – शहरी गरजांची सांगड घातली ,कल्पकेने पर्यटकांपर्यंत पोहोचले तर निसर्ग ,शेती ,मोकळ्या हवेची ओढ पर्यटकाला कृषी पर्यटनाकडे खेचून आणेल ‘ असा सूर दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेत उमटला .
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि ‘कृषी पर्यटन विश्व’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ आणि १० मार्च या दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरी, जुन्नर पुणे येथे यशस्वीरीत्या पार पडली .
या दोन दिवसीय कार्यशाळेला प्रमुख उपस्थित म्हणून एमटीडीसी प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, बँकेचे अधिकारी सचिन मस्के, ‘आमंत्रण कृषी पर्यटन’ चे शशिकांत जाधव, मनोज हाडवळे, गणेश चप्पलवार आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कृषी पर्यटन कार्यशाळेमध्ये सात जिल्ह्य़ातून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असे आयो़जक एमटीडीसीची प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.
या कार्यळेत एम.टी.डी.सीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी कृषी पर्यटनासाठी उपयुक्त आणि पूरक योजानांची माहिती दिली. कृषी पर्यटन संबंधी भविष्यातील योजनेविषयी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले . कृषी पर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अडचण आल्यास संपर्क करा असे आवाहन केले .
कार्यशाळेसाठी उपस्थित असलेला शेतकरी वर्ग यांच्या कृषी पर्यटनासाठी मिळणार असणारा पतपुरवठा यांमध्ये विविध बँकिंग योजना पर्यटन कर्ज मुद्रा योजना यांचे मार्गदर्शन सचिन मस्के यांनी केले . शेतकऱ्यांच्या शकांचे निरसन केले. ‘आमंत्रण कृषी पर्यटन केंद्राचे’ संचालक शशिकांत जाधव यांनी कृषी पर्यटनातीत इतर जोडव्यवसाय करू शकतो ,शहरातील पैसा ग्राणीण भागात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कसा आणू शकतो,कृषी पर्यटन व्यवसायात रोजगाराची संधी मोठ्यां प्रामाणात कशा उपलब्ध होत आहेत ,याविषयी मार्गदर्शन केले .
कृषी पर्यटन केंद्रांना काळाची गरज म्हणून नव माध्यंमे, डिजिटल तसेच समाज माध्यम किती महत्वाचे आहेत, मार्केटिंग व जाहिरात तंत्र , सोशल मीडियाचा असलेला जागतिक प्रभाव, वेबसाईटचे फायदे, किवर्ड आणि कंन्टेन्टचा वापर करून आपली वेबसाईट गुगल सर्च करताना कशी प्रथम निदर्शनास आणू शकतो या विषयी ‘कृषी पर्यटन विश्व ‘चे संचालक गणेश चप्पलवार यांनी मार्गदर्शन केले.
कृषी पर्यटनाची भविष्य, संधी, सध्यस्थिती, कृषी पर्यटनाबरोबरच विविध महोत्सव आणि उपक्रम कसे राबवावे याचे मार्गदर्शन मनोज हाडवळे यांनी केले. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील यशस्वी झालेला द्राक्ष महोत्सवा सारखे महोत्सव कशा पद्धतीने राबवू शकतो या विषयी या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.