छोटा गंधर्व यांच्या स्मरणरंजनाचे ‘स्मृतिगान ‘
भारतीय विद्या भवनमध्ये शुक्रवारी ‘ स्मृतिगान ‘ चे आयोजन
पुणे : ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत छोटा गंधर्व यांच्या आठवणी ,नाट्यपदे यांचे स्मरणरंजन सादर करणाऱ्या ‘ छोटा गंधर्व स्मृतिगान ‘ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दिनांक १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ७१ वा कार्यक्रम आहे.संगीत रंगभूमीवर आपल्या मधुर गळ्याने ,अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या छोटा गंधर्व यांची नाट्यपदे या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत .
शंकर कुलकर्णी यांचा संवाद ‘ प्रस्तुत हा कार्यक्रम ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.
मुकुंदराज गोडबोले ,माधुरी ओक,चिन्मय जोगळेकर ,राजश्री ओक हे गायन करणार आहेत . तबल्यावर विद्यानंद देशपांडे तर सिंथेसायझरवर अमित ओक साथसंगत करणार आहेत . छोटा गंधर्व यांचे शिष्य विश्वनाथ ओक हे छोटा गंधर्व यांच्या आठवणी सांगून कार्यक्रमाचे विवेचन करणार आहेत .