‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी ‘ मधील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी ‘ मधील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आझम कॅम्पसमधील हायटेक हॉल मध्ये डॉ . विनय ठाकूर (व्यवस्थापकीय संचालक ,मिस्टेयर हेल्थ अँड हायजिन प्रा . लि . ) यांच्या हस्ते झाले .
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार हे होते . प्राचार्य डॉ . किरण भिसे यांनी स्वागत केले . फार्मसी ,औषधोत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले . फार्मा क्षेत्रातील विद्यार्थी ,संशोधक ,प्राध्यापक उपस्थित होते . प्रा . शर्वरी हर्डीकर यांनी उदघाटन कार्य्रक्रमाचे सूत्रसंचालन केले .