भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मशीन डिझायनिंग ‘ विषयावर कार्यशाळा
पुणे :भारती अभिमत विद्यापीठच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मशीन डिझायनिंग ‘ या विषयावर कार्यशाळा तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . मोझिला कॅम्पस क्लबच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
भारती अभिमत विद्यापीठच्या धनकवडी कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ . आनंद भालेराव यांनी केले . मोझिला कॅम्पस क्लबचे आदर्श कुमार यांनी मार्गदर्शन केले . अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विभागांचे विद्यार्थी ,प्राद्यापक सहभागी झाले .