‘शिक्षक गौरव ‘ पुरस्कारांचे लखनौ महापौरांच्या हस्ते वितरण
पुणे :’अवध शिक्षक गौरव ‘ पुरस्कारांचे वितरण लखनौच्या महापौर संयुक्ता भाटिया आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट ‘चे प्राचार्य डॉ . ऋषी आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले .
लखनौमध्ये झालेल्या अखिल भारतीय कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या २२ प्राचार्यांचा आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला . ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट ‘ आणि युनिटी कॉलेज लखनौ यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले . ऋषी आचार्य ,नजमूल रिझवी यांनी मार्गदर्शन केले . सईद मेहदी सलीम सर्फानी आणि मान्यवर उपस्थित होते .