पुणे :‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ शिवार्पणम’या शिवस्तुतीपर नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम दि. २ मार्च रोजी , शनीवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवना’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
या कार्यक्रमात भरतनाट्यम ,कथक ,कुचिपुडी या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये शिवस्तुतीपर विविध रचना सादर केल्या जाणार आहेत.
संकल्पना अनुजा बाठे यांची असून शिवांजली डान्स अकॅडमी हा कार्यक्रम सादर करणार आहे . अनुजा बाठे ,साक्षी पासकंठी ,दर्शना पासकंठी ,अनुष्का भंडारी ,मैथली बहिरट,अनुजा चव्हाण ,धनश्री पुणतांबेकर ,वैष्णवी पुणतांबेकर ,राजलक्ष्मी बागडे या भरतनाटयम रचना सादर करणार आहेत . चिन्मयी गोडबोले ,अतिशा हर्षे कथक रचना आणि गौतमी गोडसे कुचीपुडी रचना सादर करणार आहेत .
‘ भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा ७० वा कार्यक्रम असून सर्वांसाठी विनामूल्य आहे.