केपीआयटी ‘आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘तर्फे ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धा १३,१४ फेब्रुवारी रोजी पुण्यात
पुणे :‘केपीआयटी’ आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘ यांचा संयुक्त उपक्रम असलेली ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धा १३,१४ फेब्रुवारी रोजी पुण्यात होत आहे . ज्ञान प्रबोधिनी चे शिक्षण विभागाचे सहकार्यवाह प्रा . विवेक पोंक्षे ,तुषार जुवेकर(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभाग प्रमुख ,’केपीआयटी’ ) ,स्पर्धा समन्वयक प्रकाश रणनवरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
मावळ -मुळशी तालुक्यातील २० शाळा ,पुणे महानगर क्षेत्रातील 10 शाळा ,पिंपरी -चिंचवड क्षेत्रातील ८ शाळा अशा 38 शाळा सहभागी होणार आहेत .
१३ फेब्रुवारी रोजी ४० शाळातील २०० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होणार आहेत . १४ फेब्रुवारी रोजी ‘अटल टिंकरिंग लॅब’ च्या २० शाळा आणि १०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत .
ही स्पर्धा ‘केपीआयटी ‘कॅम्पस , हिंजवडी -फेज -३ येथे होणार आहे . स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. या उपक्रमात ‘वी -सॉल्व्ह ‘ ही समस्या परिहार स्पर्धा असून त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातील समस्या देऊन त्यावर वैज्ञानिक उत्तर ,प्रकल्प शोधण्यास सांगण्यात येणार आहे . विजेत्यांना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,स्कुल बॅग ,व विजयी शाळांना ट्रॉफी देण्यात येणार आहे .
२०१२ मध्ये २० शाळांमध्ये ८०० विद्यार्थ्यांमध्ये सुरु झालेला हा उपक्रम १७७ शाळा आणि १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे . भारतातील २० शहरांमध्ये हा उपक्रम पोहोचला आहे .