मतदार जागृती परिषद’ तर्फे ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात सभेचे आयोजन
पुणे :
‘मतदार जागृती परिषद’ या मंचातर्फे मतदार जागृतीसाठी ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात सभेचे आयोजन करण्यात आले आहे . ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर ही सभा होणार असून अनेक सामाजिक कार्यकर्ते ,विचारवंत ,लेखक त्यात सहभागी होवून विचार मांडणार आहेत .
डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०१९,सायंकाळी ६ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन ,(मालधक्का चौक ,रेल्वे स्टेशन जवळ ), पुणे येथे ही सभा होणार आहे .
सभेचे संयोजक ,संदीप बर्वे (संघटक ,युवा क्रांती दल ),जांबुवंत मनोहर (संघटक ,युवा क्रांती दल ),मयुरी शिंदे (युवा क्रांती दल ,पुणे शहराध्यक्ष ),त्रिवेणी मार्डीकर ,सचिन पांडुळे ,अजय मेमाणे ,रोहिणी पवार ,दुर्गा शुक्रे ,इस्माईल शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
निरंजन टकले (पत्रकार ),डॉ . अभिजित वैद्य (राष्ट्रीय प्रमुख ,आरोग्यसेना ),श्रीरंजन आवटे (युवा लेखक),प्रशांत कोठडीया (मतदार जागृती परिषद) ,जांबुवंत मनोहर (संघटक ,युवा क्रांती दल ),सर्फराज अहमद (मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक ),हे वक्ते सहभागी होणार आहेत .
राजकीय पक्षांबाहेरील परिघांमध्ये ‘मतदार जागृती परिषद’ कार्यरत राहणार असून पुण्यात आणि राज्यभरात सभा आयोजित केल्या जाणार आहेत. पहिली सभा २० जानेवारी रोजी एस एम जोशी फाउंडेशन येथे झाली होती . त्यात डॉ .कुमार सप्तर्षी ,सुरेश खोपडे ,डॉ विश्वम्भर चौधरी ,श्रीरंजन आवटे ,प्रशांत कोठडीया ,मौलाना निजामुद्दीन सहभागी झाले होते .