हेल्मेट धारक दुचाकी चालकांना दिली गुलाबपुष्पे !
पुणे :
‘असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सीलोफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया ‘च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेज आयोजित मुख कर्करोग जनजागृती मोहिम आणि हेल्मेट वापराविषयी मशाल पदयात्रा १० जानेवारी रोजी , सकाळी १0 पासूून आझम कॅम्पस ,सेव्हन लव्हज चौक,स्वारगेट मार्गे भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज पर्यंत काढण्यात आली .
कॉलेजच्या प्राचार्य रमणदीप दुग्गल ,विभागप्रमुख डॉ . जे . बी . गारडे यांनी मशालयात्रेचे उदघाटन केले . विद्यार्थ्यांनी हेल्मेट धारक दुचाकी चालकांना गुलाबपुष्पे दिली तर हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांना अपघाताच्या शस्त्रक्रियांचे फोटो दाखवले ! ‘ये पान हमे इस मोड पे ले आया ‘ हे मुख कर्करोगावर जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले .
हेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या अपघातात दात तुटणे ,जबडा फाटणे ,हनुवटी तुटणे याचे प्रमाण अधिक आहे . त्यात दंत चिकित्सकांना (मॅक्सीलोफेशियल सर्जन्स ) शस्त्रक्रिया कराव्या लागतात . त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे पोस्टर घेऊन ,१०० डेंटिस्ट ,डेंटल विद्यार्थी ,या मशाल मिरवणुकीत सहभागी झाले .