वाहतूक सुरक्षा विषयक १० हजार शुभेच्छापत्रांचे वाटप करुन नववर्षाचे स्वागत !
पुणे :भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप ( आयएमईडी ) च्या राष्ट्रीय सेवा योजना ( एनएसएस ) विद्यार्थ्याकडून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वाहतूक सुरक्षा विषयक शुभेच्छापत्रांचे वाटप वाहतूक पोलिस व नागरिकांना करण्यात आले.
३१ डिसेंबर रोजी सकाळी शहरातील विविध ट्रॅफीक सिग्नल्सना उभे राहून २०० विद्याथ्र्यांनी १० हजार शुभेच्छापत्रे व ५ हजार चॉकलेट देऊन वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली.
आयएमईडी ‘ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी या उपक्रमाचे उद्घाटन कोथरूड डेपो येथे केले.डॉ. अजित मोरे, डॉ.धापटे, डॉ. विजय फाळके, डॉ. भारती जाधव तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.