बहादूरशहा जफर यांच्या शायरीवर शमीम तारिक यांचे व्याख्यान
‘रसिक मित्र मंडळ ‘च्या ‘एक कवी -एक भाषा ‘ उपक्रमातील ६० वे व्याख्यान २८ डिसेंबर रोजी
पुणे :’रसिक मित्र मंडळ ‘ यांच्यातर्फे मुघल बादशाह बहादूरशहा जफर यांच्या शायरीवर शमीम तारिक ( मुंबई ) यांचे व्याख्यान २८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
हे व्याख्यान २८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे .
रसिक मित्र मंडळ ‘च्या ‘एक कवी -एक भाषा ‘ उपक्रमातील हे ६० वे व्याख्यान आहे ,अशी माहिती रसिक मित्र मंडळ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी दिली