भारतीय भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे ‘ नृत्य संध्या ‘
पुणे :भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ नृत्य संध्या ‘ या ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे शुक्रवार ,१४ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल ,अशी माहिती भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली .
आकांक्षा ओडिसी नृत्यालय च्या संस्थापक रसिका गुमास्ते ,त्यांच्या शिष्या आणि शुभदा वारदेकर यांच्या शिष्या शमा अधिकारी या हा कार्यक्रम सादर करणार आहेत .
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६४ वा कार्यक्रम आहे . हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे