पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीदिनानिमित्त भव्य अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणूक बुधवार, दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता आझम कॅम्पस येथून निघाली.
मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले. तर संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. संस्थेच्या ३० आस्थापनांमधील १० हजार विद्यार्थी अभिवादन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले.अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी चे ३ विद्यार्थी ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई आणि फातिमाबी शेख यांच्या वेशात बग्गीत बसून सहभागी झाले .
अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७ वे वर्ष आहे. दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. गांधी,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी व पुण्यतिथीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.
संस्थेच्या सर्व संस्थातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी झाले.डॉ एन वाय काझी , शाहिद इनामदार ,वाहिद बियाबानी ,डॉ . शैला बुटवाला ,पटेल ,अब्दुल वहाब ,डॉ . व्ही . एन .जगताप ,प्रा . लीना देबनाथ ,प्रा . अनिता फ्रांट्झ ,प्रा . परवीन शेख ,डॉ किरण भिसे ,प्रा . अनिता बेलापूरकर उपस्थित होते .
मिरवणुकीचा मार्ग आझम कॅम्पस, पूना कॉलेज, गोल्डन ज्युब्ली, काशीवाडी, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक, महात्मा फुले वाडा असा होता.