डॉ . पी . ए . इनामदार याना मौलाना आझाद सन्मान प्रदान
पुणे : शैक्षणिक व सहकार क्षेत्रात बहुमूल्य काम करून या क्षेत्रास नवीन दिशा दिल्याबद्दल,तसेच मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे विचार पुढे नेल्याबद्दल महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ,मुस्लिम सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘मौलाना आझाद सन्मान ‘प्रदान करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) येथे 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात ,मौलाना आझाद जयंती निमित्त राष्ट्रवादी काँगेस पार्टीच्या वतीने हा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे व पक्षाचे संर्व वरिष्ठ नेत्याच्या प्रमुख उपस्थितित हा कार्यक्रम झाला .