भारती विद्यापीठ आय.एम.ई.डी.च्या विद्यार्थ्यांची स्वीडन व ग्रीससाठी निवड
पुणे :
भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ( आय.एम.ई.डी. )च्या चार विद्यार्थ्यांची युरोपियन युनियनमधील इरास्मस प्रोग्राम द्वारे कॅटरिनी (ग्रीस) येथे होणार्या ‘यूथ एक्सचेंज प्रोग्राम’साठी निवड झाली आहे.
हे विद्यार्थी आयएमईडीमध्ये एमबीए व बीबीएचा अभ्यासक्रम शिकत असून, त्यांना सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले आहे. ‘ पत्रकारितेमधील लिंग- समानता हक्क अधिकार ’(Gender Equality in journalism-Getting the Balance Right) हा या कार्यक्रमाचा विषय आहे.
15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या दरम्यान कॅटरिनी (ग्रीस) येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मयुरी गुप्ता, शंतनु कर्णिक, शुभांगी पांडे व शुभेंदु तुली अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
तसेच बी.बी.ए.मध्ये शिकत असणारे विनोद अलबाने व अनन्या द्विवेदी हे दोन विद्यार्थी लिनिअस विद्यापीठ, पाल्मे ( स्वीडन ) यांनी आयोजित केलेल्या स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम मध्ये निवडले गेले आहेत.
‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांची निवड झाली.
यामुळे संपूर्ण एक सत्र हे विद्यार्थी स्वीडनच्या लिनिअस विद्यापीठातच अभ्यासक्रमाचा काही भाग पूर्ण करतील.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. विश्वजीत कदम व कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी अभिनंदन केेले.