‘पुणे इंटरनॅशनल डिजिटल फोटोग्राफी सलोन एक्झीबिशन ‘मध्ये चीनचे अलेक्झांड्रिनो प्रथम
पुणे :‘ आर्ट इनसाईट मीडियम ‘ संस्थेतर्फे आयोजित “पुणे इंटरनॅशनल डिजिटल फोटोग्राफी सलोन एक्झीबिशन’ मध्ये चीन चे अलेक्झांड्रिनो एल . ए . हे छायाचित्रकार प्रथम आले . सायप्रस चे आंद्रेस आंद्रेयो द्वितीय तर चीन चे एच . डब्ल्यू .चान तृतीय आले . भारताच्या राकेश रावळ यांचा चौथा क्रमांक आला . २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन पुण्यात मोनालिसा कलाग्राम ( कोरेगाव पार्क,गल्ली क्र. ७ ) येथे करण्यात आले होते .
जेनिफर मिस्त्री, श्याम ढवळे, अजय जाधव, प्रबुद्ध घोष यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाला प्रारंभ झाला.एकूण २० देशातील १७५ फोटोग्राफर्सनी यात भाग घेतला . निवडक ४० फोटो , आणि ५०० स्लाईड प्रदर्शित करण्यात आल्या . जगाच्या फोटोग्राफी नकाशावर पुण्याला आणणे, हा या प्रदर्शनाचा हेतू होता , अशी माहिती अजय जाधव यांनी दिली.
कलर डिजिटल इमेज, मोनोक्रोम डिजिटल, फोटो ट्रॅव्हल डिजिटल या ३ प्रकारात हे प्रदर्शन होते , अशी माहिती ‘ आर्ट इनसाईट मीडियम ‘ चे सचिव प्रबुद्ध घोष, अध्यक्ष अजय जाधव यांनी दिली.अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली