राज्यस्तरीय ‘आय.टी. एक्स्पर्ट अॅवॉर्ड’ चे जावेद शेख ठरले मानकरी
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पै आय सी टी अॅकॅडमी’ च्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय आंतरशालेय ‘डॉ.पी.ए.इनामदार आय.टी. एक्स्पर्ट अॅवॉर्ड’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संगणक प्रशिक्षक जावेद शेख (शामसुद्दीन इनामदार उर्दू स्कूल, हडपसर) यांनी विजेतेपदाचा मान पटकाविला आहे.
स्पर्धेचे ११ वे वर्ष होते. ही स्पर्धा डॉ. ए.आर.शेख असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे आयोजित करण्यात आली होती.
पै आय सी टी अॅकॅडमी’ च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय ‘डॉ.पी.ए.इनामदार आय.टी. एक्स्पर्ट अॅवॉर्ड’ स्पर्धेला इक्बाल सत्तार (जुवेदी स्कूल, कुडची), नुरूद्दीन सोमजी (शिक्षण मंडळ चे माजी उपाध्यक्ष, म.न.पा, पुणे) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.ए.इनामदार (अध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी) होते. यावेळी पै आय सी टी अॅकॅडमी’ च्या संचालक मुमताझ सय्यद, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल च्या मुख्याध्यापक आयेशा शेख, ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज’ च्या प्राचार्य परवीन शेख उपस्थित होते.
ही स्पर्धा ५ प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, हार्डवेयर स्पर्धा, कॉम्पुटर टायपिंग, मूव्ही मेकिंग स्पर्धा, संगणक प्रशिक्षकांसाठी ऑनलाइन परीक्षा या स्पर्धांचा समावेश होता.
१. पहिल्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी साठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ८६६१ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेतील २ विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
२. दुसऱ्या प्रकारच्या हार्डवेयर स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी चे ८६१५ विध्यार्थी सहभागी झाले होते. पहिल्या दोन विजेत्यांना ‘हार्डवेअर टूल किट’, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
३. कॉम्पुटर टायपिंग (उर्दू, इंग्लिश ऍण्ड मराठी) इयत्ता आठवी साठी आयोजित स्पर्धेमध्ये ३२६१ विध्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम दोन विजेत्यांना संगणक संच, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
४. मूव्ही मेकिंग स्पर्धा इयत्ता नववी आणि दहावी च्या विद्यर्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत ४२८६ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम दोन विजेत्यांना कॅमेरा, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
५. संगणक प्रशिक्षकांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ८१ संगणक प्रशिक्षक सहभागी झाले होते. प्रथम विजेत्यास ‘डॉ. पी. ए. इनामदार आयटी एक्स्पर्ट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. ताशे रुपये १० हजार चा धनादेश आणि सन्मानचिन्ह देनाय्त आले.
१०६ उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे महानगरपालिका शाळा, तसेच पुण्या बाहेरील शाळा ‘पी. ए. इनामदार संगणक केंद्रा’शी संल्गन आहेत, आहि माहिती मुमताझ सय्यद यांनी प्रास्ताविकात दिली. अरीफ सय्यद (‘पै आय सी टी अॅकॅडमी’चे समन्वयक) यांनी आभार मानले.