‘हळदी -कुंकू ‘च्या माध्यमातून सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जनजागृती !
वसंत ऊर्फ बाळासाहेब अमराळे मित्र परिवाराचा विधायक उपक्रम
पुणे :’ संस्कृतीचे रक्षण करतो सणवार साजरे करून , लोकशाही सक्षम करू या मतदान करून… सुदृढ लोकशाहीसाठी हवे तुमचे मतदान, विसरू नका ,चुकवू नका … मतदानाचा वसा टाकू नका, सारासार विचार करा ‘ नोटा ‘ बाद करा या आशयाच्या फलकांद्वारे हळदी – कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविलेल्या मतदार जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुदृढ लोकशाहीसाठी शंभर टक्के मतदान होण्यासाठी भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष वसंत ऊर्फ बाळासाहेब अमराळे यांनी हळदी – कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी या विधायक उपक्रमाचे आयोजन केले होते.या उपक्रमाचे महिलावर्गांसह नागरिकांनी स्वागत करून अशा समाजपयोगी प्रबोधनाची नितांत गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याबाबत भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष वसंत ऊर्फ बाळासाहेब अमराळे म्हणाले कि, पारंपरिक सणांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच विविध विषयांवर प्रबोधनात्मक उपक्रम गेली १९ वर्षांपासून राबवित आहोत. सणांच्या माध्यमातून समाजप्रबोधन प्रभावी ठरते.आरोग्य, शिक्षण , अंधश्रद्धा, पर्यटन,स्त्री शक्ती आदीसह सामाजिक प्रश्नांवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमासाठी वसंत ऊर्फ बाळासाहेब अमराळे मित्र परिवाराने परिश्रम घेतले.