पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) च्यावतीने
मौजे मारुंजी, तालुका मुळशी, सर्वे नंबर ३२ मधील ३९६८.०० चौ.फूट आकारातील अनधिकृत
बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६च्या कलम ५३ (१) अन्वये संबधिताना
प्रत्येकी दोनदा नोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरु ठेवली होती. सदरील
३९६८.००चौ.फुट आरसीसी स्वरुपातील एकूण तीन अशी एक मजला स्वरूपातील हे
बांधकाम होते. या अनधिकृत बांधकामाचा निवासी व व्यवसायिक जागेसाठी वापर केला जात
होता. सदरची अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत
बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक दोन मार्फत केली आहे.
अतिक्रमण विभागाचे प्रमुख पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक
यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई पार पडली. अनधिकृत बांधकाम निष्कासन
कारवाईवेळी पीएमआरडीएचे तहसीलदार अर्चना तांबे, पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, सदर
कारवाई पीएमआरडीए पोलिस बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली सदरील कारवाई पार पाडण्यात
आली.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले की, ‘नागरिकांनी सदर सदनिका
खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. अनधिकृत सदनिका खोटी माहिती देऊन स्वस्त दराचे
आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाते, नागरिकांचे आर्थिक नुकसान टळावे
याकरिता नागरिकांनी जागरूक राहावे.
नागरिकांनी अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ नावाचे अॅप
डाऊनलोड करून तक्रार नोंदवावी. शासन निर्णय ७.१०.१७ नुसारच्या अटीनुसार
३१.१२.२०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमनाकुल करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश
विकास प्राधिकरणाकडे दि. २१ जानेवारी २०१९ पूर्वी अर्ज करून बांधकामे नियमनाकुल
करून देण्यात येतील असे आवाहन केले आहे.