पुणे- मुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टीसाठी घेतलेला निर्णय मान्य आहे ,त्याबद्दल त्यांचे अभिनंदन …पण आता त्वरेने काम सुरु करा असे सांगत माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी इथे शिवसृष्टी सारखे चांगले काम होताना काही सूर्याजी पिसाळ निर्माण होत आहेत ,पण अशा पिसाळांना उत्तर देण्याचं काम हा दीपक मानकर करेल … असा गर्भित इशारा तथाकथित पर्यावरणवाद्यांना दिला .
आज महापालिकेच्या शिवसृष्टीवरील खास सभेत ते बोलत होते . यावेळी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत या विषयावर 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीचा आणि निर्णयाचा परामर्श घेण्यात आला .
येथे शिवसृष्टी होऊ नये म्हणून कधीही एक झाड न लावलेल्यांनी पर्यावरणाची झूल अंगावर पांघरून भूल देण्याचे काम करू नये शासनाने देखील आम्बेगावला जर काल ३०० कोटी अशाच कारणास्तव दिले असतील तर मुख्यमंत्री इथेही ५०० कोटी देतील मला त्यांच्यावर विश्वास वाटतो आहे म्हणून मी चांदणी चौकातील शिवसृष्टीला मान्यता दिली . पण येथील जागा आता त्वरेने ताब्यात घेवून वर्षभरात शिवसृष्टी उभारण्याची त्यांची जबाबदारी आहे . जर जागा देता येत नसेल तर माझी १०० एकर जागा आहे असे सांगत दीपक मानकर यांनी शिवसृष्टीबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांसह पालिकेतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले . मानकर यांनी २००८ पासून शिवसृष्टी व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत .पण आता श्रेयावादावरून लढाई होते आहे .याबाबत ते म्हणाले ,’ क्रेडीट कोणालाही घेवू द्यात पण शिवसृष्टी त्वरेने करा’ शिवसृष्टीसाठी पाहिजे ते बलिदान करण्याची आपली तयारी आहे .
पहा आणि ऐका मानकर यांचे पूर्ण भाषण …जसेच्या तसे ….