१२ वर्षे त्यांनी घालविली-ते -आम्ही २ वर्षात केलं-पालकमंत्री बापट(व्हिडीओ)
पुणे- त्यांनी १२ वर्षे निव्वळ चर्चा केली, ते आम्ही केवळ २ वर्षात केलं, ३ मेट्रो चे जाळे आम्ही शहरभर उभारत आहोत आज काम मेट्रो चे काम सुरु असल्याचे , आणि लवकरच मेट्रो सुरु होईल हे लोकांना दिसते आहे असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी आमचे महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधी हे चांगले काम करीत आहेत अशी प्रशंसा येथे केली .
आज प्रभाग क्रमाक १० बावधन मधील चांदणो चौका जवळील वेदाचार्य घैसास गुरुजी पाठशाळेजवळ महापालिकेच्या अग्निशमन केंद्राचा आणि अग्निशामक दल जवान प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा येथे पालकमंत्री बापट यांच्या हस्ते पार पडला . यावेळी महापौर मुक्ता टिळक ,आ. भीमराव तापकीर ,ज्यांच्या पुढाकाराने हे केंद्र सुरु होत आहे ते नगरसेवक दिलीप वेडे पाटील ,किरण दगडे पा. ,अल्पना वर्पे,श्रद्धा प्रभुणे तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी नेमके पालकमंत्री गिरीश बापट काय म्हणाले ते पहा आणि ऐका त्यांच्याच शब्दात …..