पुणे- महापालिकेच्या स्थायी समितीने आणि नंतर त्वरित मुख्य सभेने आपापल्या परीने पार्किंग पॉलीसी ला मान्यता दिल्यानंतरही भाजपचे पालिका राजकारणातील हेडमास्तर आणि भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी आज पालकमंत्री गिरीश बापट ,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या समक्ष आज आपल्या भूमिकेवार ठाम राहत ‘जो पर्यंत पार्किंग लॉट पूर्णपणे विकसित होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पार्किंगच्या १ रुपयाचीही आकारणी होणार नाही .सामान्य नागरिकाच्या वाहनासाठी वेड्यावाकड्या पद्धतीने दर आकारणी करणे म्हणजे पार्किंग धोरण नाही .आधी व्यवस्था , सुविधा, मग धोरण आणि मग त्यासंदर्भातील दर निश्चिती ..असाच प्रकार होईल हे आज पुन्हा ठणकावून सांगितले.
भाजपचा शहर अध्यक्ष म्हणून हे पालकमंत्री यांच्या साक्षीने सांगतो हे लक्षात घ्या .. असेही स्पष्ट त्यांनी सुनावले .
आज सकाळी सेव्हन लव्हज चौक ते मार्केट यार्ड अशा उड्डाणपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते .आयुक्त कुणालकुमार यांनी संपूर्ण पालिकेच्या परिसरात प्रचंड पार्किंग शुल्क आकारणी असलेला प्रस्ताव स्थायी समिती पुढे ठेवला होता . त्यास गोगावले यांनी आक्षेप घेला होता आणि आपली भूमिका स्पष्ट केली होती . त्यानंतर त्यांची भूमिका लक्षात घेवून आम्ही पार्किंग शुल्क ८० टक्क्यांनी कमी केले असे सांगत स्थायी समिती मध्ये हि पॉलिसी मंजूर करण्यात आली . त्यानंतर शहरात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या . आंदोलने झाली आणि मुख्य सभेने हि पॉलीसी केवळ ५ रस्त्यांवर मंजूर केली .
आता पुन्हा त्यानंतर अजूनही आपण भूमिकेवर ठाम असल्याचेच आज गोगावले यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले आहे . विशेष म्हणजे मंत्री , महापौर ,सभागृहनेते ,स्थायी समिती अध्यक्ष ,नगरसेवक उपस्थित असलेल्या आणि जनतेमधील कार्यक्रमात त्यांनी हे फटकारे आहेत . प्रत्यक्षात गोगावले काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात पहा आणि ऐका….