पुणे – सेव्हन लव्हज चौक (अप्सरा सिनेमा )ते मार्केटयार्ड (वखार महामंडळपर्यंत) सुमारे 1 किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्याच्या प्रकल्पाला महापालिकेने तांत्रिकदृष्ट्या मान्यता दिली असून याच बरोबर एच सी एम टी आर च्या नियोजित उड्डाणपूला साठी ही याच प्रकल्पात सोय असावी या दृष्टीने रचना करण्यात येत असून लवकरच या पुलाचे पूर्वगणन पत्रक करून पुढील कामास प्रारंभ होईल अशी माहिती महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी येथे दिली .
आपल्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण असा असून तो उत्कृष्ट रित्या राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगून भिमाले म्हणाले ,या पुलाच्या संकल्पित रचनेला महापालिकेच्या एस्टिमेट कमिटी बैठकीत मान्यता देण्यात आली. या पूलामुळे या भागातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. याशिवाय पुलामुळे हडपसरकडून मार्केटयार्ड, कोंढवा, बिबवेवाडी, गंगाधाम तसेच पुढे कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध होणार आहे.स्वारगेट, पुणे स्टेशन तसेच हडपसरकडून आलेली वाहने मार्केटयार्ड तसेच पुढे गंगाधाम आणि कोंढव्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, सेव्हन लव्हज चौकापासून पुढे सॅलिसबरी पार्क तसेच पुढे मार्केटकडे जाताना तसेच येताना या रस्त्याचे रुंदीकरण झालेले असले, तरी हा रस्ता वाहतुकीस अपुरा पडतो. परिणामी, सकाळी-सायंकाळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.या रस्त्यावरून मार्केटयार्डसमोरून सातारा रस्ता, धनकवडी तसेच पुढे गंगाधाम चौकातून बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगरकडे जात-येत असल्याने वाहनांची संख्या लक्षणीय असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून या नेहरू रस्त्यावर अप्सरा सिनेमा ते मार्केटयार्ड जवळील वखार महामंड़ळ गोडाऊनपर्यंत उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. सुमारे 1 किलोमीटर अंतराचा हा पूल असून त्यावरून दुहेरी वाहतूक असणार आहे.
दरम्यान महापालिकेकडून उभारला जाणारा हा पूल आणि महापालिकेकडून नेहरू रस्त्याच्या काही मार्गावर एचसीएमटीआर रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला असून या रस्त्याचा विचारही या पुलाच्या रचनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार, पुलाचे बांधकाम करतानाच त्याचे खांब हे एचसीएमटीआर रस्त्याच्या रचनेशी सुसंगत असणार असल्याचे या सादरीकरणात सांगण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी हा नवीन पूल दुमजली असणार होईल असे स्पष्ट चित्र आहे .
यासंदर्भात पहा आणि ऐका नेमके सभागृह नेते भिमाले यांनी काय सांगितले ….